NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / मंदिर नव्हे हे तर विमानतळ; जगातील एकमेव एअरपोर्ट जिथं हिंदू देवतांचा जागर

मंदिर नव्हे हे तर विमानतळ; जगातील एकमेव एअरपोर्ट जिथं हिंदू देवतांचा जागर

भारतात भगवान रामाच्या नावानं विमानतळ उभं राहणार आहे. पण त्याआधी जगातील हे एकमेव विमानतळ पाहा जे कोणत्या मंदिरापेक्षा कमी नाही.

16

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केलं की अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या नवीन विमानतळाचं नावं हे मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांच्या नावावर असेल. असं झाल्यास कोणत्याही हिंदू देवाच्या नावाचं हे देशातलं पाहिलं विमानतळ असेल. आजपर्यंत देशातल्या कुठल्याच विमानतळाच नावं हे कुठल्याही देवाच्या नावावरून नाही. पण जगात असं एक विमानतळ नक्कीच आहे जे हिंदू देवाला समर्पित आहे. तिथं बऱ्याच ठिकाणी त्यांची मूर्ती दिसून येते.

26

हे थायलंडची राजधानी बँगकॉकचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. दक्षिण आशियातील हे सर्वात मोठे विमानतळ असून याचं संस्कृतमध्ये नावं ‘स्वर्णभूमी’ विमानतळ असं ठेवलं आहे.

36

बँकॉक विमानतळावरील अमृत मंथनची ही विशाल मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेते. यामध्ये देव आणि असुर यांच्यात अमृत मिळवण्यासाठी समुद्रात मंथन झालं होतं. यात दोरी बनण्याचं काम बासुकी नागानं पार पाडलं होतं. ही संपूर्ण मूर्ती खास थाई शैलीत बनवली गेली आहे. यात भगवान विष्णु नागाच्या डोक्यावर विराजमान झालेले दिसत आहेत.

46

थायलंड हा आता बौद्ध देश आहे, पण त्यापूर्वी इथं हिंदू धर्म होता. आजही इथं सर्व प्रथा हिंदू परंपरेनुसार केल्या जातात. इथं संस्कृत बोलली जाते. थायलंडचे माजी राजा भूमीबोल यांनी या विमानतळाचे नाव स्वर्णभूमी असं ठेवलं आणि भगवान विष्णूला ते समर्पित केलं. म्हणूनच विमानतळाच्या प्रत्येक भागात भगवान विष्णूची झलक पहायला मिळते.

56

याच विमानतळावर भगवान विष्णुच्या वाहनाची अर्थात गरुडाची एक मूर्तीसुद्धा आहे. विमानतळावर भारतीय आणि बुद्ध संस्कृतीची झलक सुद्धा पहायला मिळते.

66

याचप्रमाणे इंडोनेशियाची राजधानी बालीच्या विमानतळावरून बाहेर पडताच समोर एका इमारतीवर गरुडावर स्वार भगवान विष्णुंची एक मोठी मूर्ती दिसून येते. एकेकाळी मलेशिया, इंडोनेशिया, मालदीव, कंबोडिया आणि थायलंडमध्ये हिंदू धर्म आणि संस्कृती होती पण नंतर बौद्ध किंवा मुस्लिम धर्माने त्याची जागा घेतली. परंतु असं असलं तरी या सगळ्या देशात अजूनही हिंदू मंदिरं आणि संस्कृती दिसून येते.

  • FIRST PUBLISHED :