NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / स्वत:ला अपत्य नाही पण शेकडो अनाथांची ही आई, तिच्या शौर्याची कमाल पाहा PHOTOS

स्वत:ला अपत्य नाही पण शेकडो अनाथांची ही आई, तिच्या शौर्याची कमाल पाहा PHOTOS

राजस्थानमधील भरतपूरमध्ये एक अशी आई आहे जिला स्वतःचे एकही मूल नाही, तरीही ती 169 मुलांची आई बनली आहे. (ललितेश कुशवाह)

15

आई या शब्दासमोर सगळं काही थांबलं जात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईची भूमिका महत्त्वाची असते. दरम्यान राजस्थानमधील भरतपूरमध्ये एक अशी आई आहे जिला स्वतःचे एकही मूल नाही, तरीही ती 169 मुलांची आई बनली आहे. ही आई म्हणजे अपना घर आश्रमाच्या संचालिका डॉ. माधुरी भारद्वाज आहेत. माधुरी या निराधार मुलांना आश्रमात स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेतात यामुळे त्यांचे सगळीकडे कौतुक होत आहे.

25

आश्रमातील सर्वच मुलं माधुरी यांना आई तर त्यांचे पती डॉ.बी.एम. भारद्वाज यांना वडील म्हणतात. भारद्वाज दाम्पत्याने पोटच्या मुलासारखं या मुलांच्या जेवणाची, शिक्षणाची काळजी घेतली आहे. या मुलांची काळजी घेण्यासाठी आश्रमात राहणाऱ्या महिलांसोबतच बाहेरगावच्या महिलांचाही सहभाग असतो.

35

राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील बढेरा गावात असलेल्या अपना घर आश्रमाच्या संचालिका डॉ. माधुरी भारद्वाज म्हणाल्या की, या आश्रमात निराधार लोक राहतात. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. यातील बहुतांश महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत. यामुळे त्या आपल्या मुलांची काळजी घेऊ शकत नाहीत.

45

त्यामुळेच या मुलांच्या देखभालीसाठी आश्रमात स्वतंत्र व्यवस्था आहे. ज्यामध्ये लहान वयापासून ते 18 वर्षांपर्यंतची मुले आहेत. सध्या या घरात 169 मुले राहतात. या आश्रमात माझ्याशिवाय आश्रमात राहणाऱ्या महिलांसह बाहेरून आलेल्या महिला काम करतात. यामुलांची जेवण, खेळापासून ते शिक्षणापर्यंत या मुलांची काळजी घेतली जात असल्याचे त्या म्हणाल्या.

55

आई हा असा शब्द आहे जो प्रत्येक स्त्रीला सन्मान देतो. मुलाच्या सुरक्षिततेपासून प्रत्येक गरजा पूर्ण करणारी आई असते. आई म्हणजे मुलाचे संपूर्ण जग असल्याने यामुलांचे संगोपण करताना आईपण नसल्याची कोणतीही उणीव आम्ही भासवून देत नाही. या आश्रमात बिहार, ओडिशा, यूपी, मध्यप्रदेश, हरियाणा, दिल्ली, पंजाब, बंगाल, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी भागातील मुले राहत असल्याचे भारद्वाज म्हणाल्या.

  • FIRST PUBLISHED :