सागरच्या मध्यवर्ती कारागृहात एक महिला गेल्या 12 वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. दुसरीकडे तिच्या नवऱ्याला आता तिच्याशी आणि मुलाबाळांशी काही घेणं देणं उरलेलं नाही. पण आई ही आई असते.
ती कुठेही असली तरी तिला नेहमी आपल्या मुलांची काळजी असते. यूपीच्या ललितपूर जिल्ह्यातील उर्मिलाचा विवाह 16 वर्षांपूर्वी सागर जिल्ह्यातील बिना श्यामपुरा येथील रहिवासी कैलाश राजक याच्याशी झाला होता.
तिच्या आयुष्यात सारं काही ठिक होतं. त्यात 3 वर्षात तिने दोन मुलींना जन्मही दिला. त्यात वेळेनुसार, मुली मोठ्या होत गेल्या. मात्र, याचदरम्यान, उर्मिला एका फेऱ्यात अडकली आणि तिला कलम 302 अंतर्गत तुरुंगात टाकण्यात आले.
इकडे उर्मिलाला तुरुंगवास झाल्यावर, दुसरीकडे तिच्या पतीसह परिवाराने तिच्या मुलींना एकटे सोडून दिले. त्या मुलींना त्यांनी उर्मिलाच्या माहेरी पाठवून दिले.
मात्र म्हातारपणामुळे त्यांची आर्थिक स्थितीही चांगली नव्हती. त्यामुळे पैसे मिळवणे गरजेचे होते. यानंतर ती कारागृहातच गहू वेचण्याचे काम करू लागली. मग पापड करायला शिकल्यावर ती तुरुंगात पापड बनवायला लागली.
आता गेल्या काही महिन्यांपासून तिची ड्युटी तुरुंग सेवेत लावण्यात आली असून, त्याअंतर्गत ती नाइट वॉचमनची ड्युटी करते. यातून मिळणारा पैसा मुली जेव्हा भेटायला आल्यावर त्यांना ती देऊन देते, जेणेकरून त्या त्यांच्या मर्यादित गरजा पूर्ण करू शकतील.
जेलर गीता राठोड यांनी सांगितले की, कारागृहात 78 महिला कैदी आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध कामांचे वाटपही त्यांच्यात करण्यात आले आहे, यामध्ये भरतकाम, शिवणकाम, विणकाम अशी अनेक कामे केली जातात आणि नंतर त्यांना मिळणारी मजुरी त्यांना दिली जाते, त्यानंतर ती मजूरी या महिल्या विविध माध्यमातून आपल्या घरी पाठवून देतात.