टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि बडे उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा मुंबई-अहमदाबाद हायवेवरील पालघर येथे अपघाती मृत्यू झाला.
54 वर्षीय मिस्त्री यांच्या मर्सिडीजमध्ये चौघेजणं होतं. या अपघातात मिस्त्रींसह दोघांचा मृत्यू झाला.
या अपघातात सायरस मिस्त्रींसह जहांगीर दिनशा पंडोले यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनायत पंडोले (कार चालक) आणि तिचे पती दरीयस पंडोले जखमी झाले आहेत.
अनायत पंडोले या मुंबईतील ब्रीज कँन्डी रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करतात. त्याच मिस्त्रींची मर्सिडीज ड्राइव्ह करीत होत्या. त्यांचे पती दरीयस मंडोले JM फायनॅन्शीयलमध्ये CEO आहेत.
सायरसबरोबर ज्यांचा मृत्यू झाला ते जहांगीर पंडोले हे दरीयस मंडोले यांचे वडील होते.
हे चौघेही गुजरातच्या उदवाडामधील पारशी मंदिराचं दर्शन घेऊन परतत होते. उदवाडा हे पारशींमध्ये पवित्र तीर्थस्थळ मानलं जातं.