छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील उरगा ठाणे परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. तुम्ही या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर बाथरुममध्ये जात असाल तर सावधान, कारण जरासा हलगर्जीपणा तुमचा जीव घेऊ शकतो. कोरबा जिल्ह्यातील उरगा परिसरातील एक व्यक्ती सत्यम कुर्रे ऑफिसच्या बाथरुममध्ये फ्रेश व्हायला जात होता. मात्र, याचवेळी त्याला कमोड वर एक चार फुटाचा कोबरा साप दिसला.
यावेळी हे दृश्य पाहिल्यावर ओरडत तो बाथरुमच्या बाहेर आला आणि ऑफिसच्या कामात करणारे इतर सहकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की, बाथरुमच्या आतमध्ये एक विषारी साप आहे. तसेच त्यांनी याबाबत आरसीआरएस संस्थेचे अध्यक्ष अविनाश यादव यांनाही याबाबतची माहिती दिली.
यानंतर लगेचच अविनाश यादव यांनी लगेचच आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि या विषारी सापाला आपल्या ताब्यात घेतले. तसेच त्याला एका बॅगेत टाकले. या पथकात संस्थेचे सदस्य लोकेश, उमेश आणि आयुषही होते. सापाला सुरक्षित रेस्क्यु करण्यासाठी सत्यम कुर्रे यांनी अविनाश यादव यांचे आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले.
दरम्यान, सापाला सुरक्षित रेस्क्यु केल्यानंतर जंगलात सोडून देण्यात आले. अविनाश यादव यांनी जनतेला आवाहन केले आहे की, पावसाळ्यात सावधान राहिले पाहिजे.
अविनाश यादव म्हणाले की, आपल्या घराच्या आजूबाजूला साफ-सफाई ठेवावी. बूट आणि सँडल किंवा अन्य फूटवेअर जमिनीच्या वर ठेवावी आणि त्यांना घालण्यापूर्वी एकदा नक्की तपासा. घरात लाईट गेल्यावर आपत्कालीन लाईट ठेवावा तसेच अंधारात टॉर्चचा वापर करावा. घरात जमिनीवर झोपण्यापूर्वी खाली कपडा जरुर ठेवावा आणि झोपण्याआधी मच्छरदानीचा वापर नक्की करावा.