जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.
कोरोनामुळे या वर्षी हा योग दिन घरात राहून आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.
या योग दिनानिमित्तानं सीमेवर जवानांनीही सोशल डिस्टन्सिंग राखून योग आणि प्राणायाम केला आहे.
अगं गोठवणाऱ्या थंडीत जवान योग करत असल्याचे काही खास फोटो
लडाखमध्ये सीमेवर योग दिवस योगासन करून साजरा केला जात आहे. बर्फात इम्युनिटी चांगली राहण्यासाठी जवान योग आणि प्राणायम करत असल्याचं दिसत आहे.
योग अॅट होम योग विथ फॅमेली ही यावेळेची थीम आहे. सीमेवर असणाऱ्या जवानांनीही योग दिन उत्साहात साजरा केला.
योग हा केवळ शरीरासाठीच नाही तर मानसिक शांतता आणि स्वास्थ सुधारण्यासाठी महत्त्वाचा असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधताना म्हटलं होतं.
योग आणि प्राणायमामुळे आपली इम्युनिटी वाढते त्यामुळे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी त्याचा फायदा होईल.
भारतीय जवान 18 हजार फूट उंच बर्फाळ प्रदेशात या कवायती, योग करत आहेत.
वृक्षासन करताना