अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान सर्वांच्या नजरा खिळल्या त्या त्यांची मुलगी ‘इवांका ट्रम्प’वर
ताजमहाल पाहण्यासाठी इवांकांचा उत्साह सर्वाधिक होता. बॅकग्राउंडमध्ये असणारा ताजमहाल हा फोटो काढण्याचा मोह इवांकालाही आवरला नाही.
प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या आग्राच्या ताजमहालजवळ इवांकाने नवरा जरेड कुशनरबरोबर देखील खूप सारे फोटो काढले.
भारत दौऱ्यादरम्यान इवांकाने तिच्या कपड्यांना खास भारतीय टच दिल्याचं पाहायला मिळालं.
भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी इवांकाने खास भारतीय शेरवानी परिधान केली होती. विशेष म्हणजे या शेरवानीची डिझायनरही भारतीयच आहे
भारत दौऱ्यादरम्यान ट्रम्प कुटुंबीयांमध्ये सर्वात उत्साह 'इवांका ट्रम्प' मध्ये पाहायला मिळाला. अनेकदा ती सेल्फी काढताना दिसली
बिझनेसवुमन असणारी इवांका नेहमीच आपल्या वडिलांच्या पाठिशी उभी राहिलेली दिसली.
भारत दौऱ्यादरम्यान प्रत्येक दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह इवांकाला आवरला नाही
इवांकाने परिधान केलेली ही सुंदर शेरवानी मराठमोळी डिझायनर अनिता डोंगरे हिने डिझाइन केली आहे. तिने इन्साग्रामवर फोटो शेअर करत त्याला 'सुरूही शेरवानी' असं कॅप्शन दिलं आहे.