NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / इंदूर सहाव्यांदा ठरलं 'स्वच्छ' शहर! सुरत दुसऱ्या तर मुंबई या स्थानावर, महाराष्ट्र देशात नंबर 2

इंदूर सहाव्यांदा ठरलं 'स्वच्छ' शहर! सुरत दुसऱ्या तर मुंबई या स्थानावर, महाराष्ट्र देशात नंबर 2

Cleanest city of India: मध्य प्रदेशतील इंदूर शहराने पुन्हा एकदा स्वच्छतेच्या बाबतीत देशातील सर्व शहरांना मागे टाकले आहे.

17

केंद्राच्या वार्षिक सर्वेक्षणात इंदूर सलग सहाव्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. यानंतर सुरत दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षणाचा निकाल शनिवारी जाहीर झाला.

27

'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022' सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेशने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यानंतर छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

37

इंदूर आणि सुरतने यावर्षी मोठ्या शहरांच्या श्रेणीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर विजयवाडा यांनी तिसरे स्थान गमावले आहे. त्यानंतर नवी मुंबईला ही जागा मिळाली.

47

सर्वेक्षणाच्या निकालांनुसार, त्रिपुरा 100 पेक्षा कमी शहरी स्थानिक संस्था असलेल्या राज्यांमध्ये अव्वल आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी येथे एका कार्यक्रमात विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी आणि इतरही उपस्थित होते.

57

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत महाराष्ट्रातील पाचगणी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ छत्तीसगडमधील पाटण (एनपी) आणि महाराष्ट्रातील कराड यांचा क्रमांक लागतो.

67

एक लाखाहून अधिक लोकसंख्येच्या श्रेणीत हरिद्वार हे गंगेच्या काठावरील सर्वात स्वच्छ शहर राहिले. त्यानंतर वाराणसी आणि ऋषिकेशचा क्रमांक लागतो. सर्वेक्षणाच्या निकालांनुसार, एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गंगेच्या काठावर वसलेल्या शहरांमध्ये बिजनौर पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे कन्नौज आणि गडमुक्तेश्वर होते.

77

या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील देवळाली हे देशातील सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्ड ठरले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या (शहरी) प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी आणि विविध स्वच्छता मापदंडांच्या आधारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था (ULBs) श्रेणीबद्ध करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणाची सातवी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती.

  • FIRST PUBLISHED :