देशव्यापी लॉकडाऊन सुरू होऊन आज बरोबर महिना झाला. पण हे कडक निर्बंध असूनही आपल्याकडे सोशल डिस्टन्सिंगचे नियम सगळीकडे पाळले जात नाहीत, हे दाखवणारे काही फोटो
देशव्यापी लॉकडाऊनला आज 30 दिवस झाले. आपण सगळेच आता लॉकडाऊन संपायची वाट पाहात आहोत. पण हे निर्बंध लागू असतानाच आपल्या बाजारपेठांमध्ये आणि रस्त्यावर सोशल डिस्टन्सिंगचा कसा बोऱ्या वाजतोय पाहा. लॉकडाऊन उठल्यावर काय होणार?
ठाणे हा रेड झोनमधला जिल्हा. ठाणे शहरातही दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. तरीही ठाण्याच्या बाजारपेठेत हे चित्र दोन दिवसांपूर्वी दिसलं.
ठाण्यातील पोखरण रोड 2 येथील गांधीनगर परिसरात भाजी मंडईमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण पणे फज्जा उडाला.
स्थानिक नागरिकांनी वर्तक नगर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या या विभागाच्या बाबतीत वेळो वेळी तक्रार करून देखील या ठिकाणी पालिका लक्ष व फिरकत नसल्याचे सांगत आहे.
भाजी आणि दूध खरेदी करत असताना सोशल डिस्टनसिंग तर सोडाच विक्रेता आणि ग्राहक यांच्या तोंडाला मास्क लावलेले देखील दिसून येत नाहीत.
राजधानी दिल्लीतले हे फोटो पाहा आता..
दिल्लीच्या चांदनी चौक भागातल्या एका बाजारातले हे फोटो लोक सोशल डिस्टन्सिंगबाबत किती गंभीर आहेत हे दाखवणारे आहेत.
लाल खान बाजार या चाँदनी चौक भागातल्या बाजारात ही एवढी गर्दी 24 एप्रिलला उसळली होती.
या गर्दीत एखादा जरी कोरोना पॉझिटिव्ह असेल किंवा विषाणूचा वाहक असेल तर दिल्लीची संख्या किती पट वाढेल विचार करा..
अगदी असंच चित्र दक्षिणेत कर्नाटकातल्या मंगळुरूच्या बाजारपेठेत दिसलं होतं.
पुण्यात लॉकडाऊन चे नियम न पाळणाऱ्यांना पोलीस हरप्रकारे समजावून सांगत आहेत. रस्त्यात बसवून शिक्षाही करत आहेत. पण कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक पुरेसे प्रयत्न करत नसल्याचं स्पष्ट आहे.
मुंबईत वांद्र्याला परप्रांतीय मजुरांनी लॉकडाऊनमध्ये अशीच गर्दी करत आंदोलन केलं होतं.