आयएएस अधिकारी टीना डाबी आणि आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी लग्न केलं होतं. आयएएस टीना डाबींचं हे दुसरं लग्न आहे. या सप्टेंबर महिन्यात टीना आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत.
टीना डाबी यांनी मॅटर्निटी लीव्हसाठी राज्य सरकारला पत्र पाठवलं, त्यानंतर त्या गरोदर असल्याची बातमी समोर आली. यानंतर इंटरनेटवर त्यांच्या पतीचं वय सर्च केलं जात आहे.
टीना डाबी यांचे पती प्रदीप गावंडे त्यांच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठे आहेत. महिलांच्या वाढत्या वयाचा जसा गरोदरपणावर परिणाम होतो, तसाच पुरुषांच्या वाढत्या वयाचा मुलांवर परिणाम होतो का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
डॉक्टरांच्या मते, ज्याप्रमाणे वाढत्या वयामुळे महिलांची फर्टिलिटी कमी होते, त्याचप्रमाणे वाढत्या वयाचा पुरुषांच्या स्पर्मच्या क्वालिटी व क्वांटिटीवरही परिणाम होतो.
तज्ज्ञांच्या मते, पुरुषांचे स्पर्म प्रॉडक्शन कधीच थांबत नाही. पण वाढत्या वयासोबत स्पर्मचा डीएनए डॅमेज होण्याची शक्यता खूप वाढते. परिणामी, प्रजनन क्षमता प्रभावित होऊ शकते.
ट्रान्सलेशन सायकॅट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, वडिलांचं वय अधिक असेल तर त्याचा सर्वाधिक परिणाम बाळाच्या मेंदूवर होतो. यामुळे मुलांमध्ये मज्जातंतूच्या विकासासंबंधित विकार आढळतात.
2012 मध्ये हावर्ड विद्यापीठात एक अभ्यास केला गेला होता. त्यात असं आढळलं की वडिलांचं वय व क्रोमोझोम यांच्यात एक संबंध असतो, ज्यामुळे मूल दीर्घायुषी होतं.
कॅलिफॉर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी मुलांच्या पालकत्वासाठी वडिलांच्या योग्य वयाचा शोध घेतला. त्यानुसार, वडिलांचं जास्त वय मुलांसाठी फायद्याचं असतं. यामुळे मुलं भावनिकदृष्ट्या तयार म्हणजे मॅच्युअर होतात.