तामिळनाडूतील दिंडीगुलमध्ये एक अनोखं रुग्णालय आहे. पेन हॉस्पिटल या नावाने ते ओळखलं जातं. ज्याप्रमाणे आपल्यासाठी किंवा प्राण्यांसाठी ठराविक रुग्णालय असतात. तसंच हे रुग्णालय आहे. जे पेन दुरुस्त करणं आणि जुनी पेन संग्रहित करण्याचं काम करतं. दिंडीगुलमधल्या मनकुंडूजवळील शेख मायदीन पेन हॉस्पिटलमध्ये तुटलेली पेनं दुरुस्त केली जातात.
इथे वैविध्यपूर्ण पेन विक्रीसाठीदेखील उपलब्ध आहेत. पारंपरिक पेन दुरुस्ती दुकानांच्या तुलनेत या रुग्णालयाचा उद्देश थोडा वेगळा असून ते अपारंपरिक दृष्टिकोनातून उभारण्यात आलं आहे.
दिंडीगुल येथील या पेन हॉस्पिटलमध्ये 5 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत खास आणि वैविध्यपूर्ण पेन उपलब्ध आहेत. तथापि खास शाईच्या पेनांच्या संग्रह हे या रुग्णालयाचं वैशिष्ट्य आहे. येथे 30 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत पार्कर पेनही मिळतात. कोणतंही पेन दुरुस्त करून देणं हे या पेन हॉस्पिटलचं वेगळेपण म्हणता येईल.
या दुकानाची स्थापना मूळ मालकाच्या आजोबांनी 1975 मध्ये केली होती. मालकाचे वडील कमरुद्दीन यांच्या सन्मानार्थ दुकानाचं नाव शेख मायदीन पेन हॉस्पिटल असं ठेवण्यात आलं. वडीलांसह या पेन हॉस्पिटलचं व्यवस्थान आता तिसरी पिढी करत आहे.
एखाद्या व्यवसायात 50 वर्षांचा टप्पा गाठणं ही महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. म्हणूनच आजोबांनी सुरू केलेला वारसा पुढे सुरू ठेवण्याचा आणि पेन हॉस्पिटलसाठी वडिलांचा दृष्टीकोन कायम ठेवण्याचा निर्धार कौतुकास्पद आहे.