पाकिस्तान सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. 7 मुलींना अटक झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पाकिस्तान सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. 7 मुलींना अटक झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राजस्थानातल्या बाडमेरमध्ये गोल्डन स्पा नावाने स्पा सेंटर चालवलं जात होतं. त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. तिथे 5 तरुणींना आणि 2 युवकांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.
पोलीस स्वतःच या स्पा सेंटरमध्ये ग्राहक बनून गेले आणि त्यांनी थेट सेक्स रॅकेटच्या गोटात शिरत आरोपींना रंगेहाथ पकडलं.
फक्त राजस्थानच नव्हे तर अगदी दिल्लीपासून उत्तर प्रदेश, हरियाणा अशा बाहेरच्या राज्यातूनही या कामासाठी मुलींना बोलावलं जायचं.
स्पा सेंटरचा मालक अटकेत आहे. राजस्थान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.