दिल्लीमध्ये सध्या महाप्रलय आला आहे. देशाच्या राजधानीमध्ये सध्या कंबरेएवढं पाणी भरलं आहे. यमुना नदी पात्र सोडून वाहत असल्याने सगळीकडे पूर आला आहे.
यमुना नदीला आलेल्या पुरामुळे दिल्लीत लाल किल्ल्याच्या भागातील रस्तेही जलमय झाले आहेत. तिथली परिस्थिती अत्यंत भीषण आहे.
दिल्लीतील अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून रविवारपर्यंत शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.
यमुनेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीचा राजधानीकडे येणाऱ्या-जाणाऱ्या ३४२ गाड्यांवरही परिणाम झाला आहे.
यापैकी सुमारे 140 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय, DMRC ने यमुना बँक मेट्रो स्टेशनवर प्रवेश प्रतिबंधित केला आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेला एकमेकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, यमुनेचे पाणी सखल भागात गेल्याने पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाल्याच्या बातम्या अनेक ठिकाणाहून येत आहेत.
देशाची राजधानी दिल्लीत सध्या यमुना नदीला पूर आला असून, त्यामुळे अनेक भागात पुराचे पाणी शिरले आहे.
त्यानंतर दिल्लीतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे रविवारपर्यंत बंद करण्यात आली आहेत. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली.