हा फोटो पीटीआयचे फोटोग्राफर अतुल यादव यांनी काढला असून यामध्ये एक मजूर रस्त्याच्या कडेला फोनवर बोलताना आसवं गाळत आहे. यातील इसमाचं नाव राम पुकार पंडित असून ते बिहारचे आहेत. दिल्लीमध्ये ते काम करतात, घरी जाताना त्यांना यूपी गेटजवळ अडवण्यात आले. त्यांच्या एका वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला होता, त्याला शेवटचं पाहता देखील आलं नाही. (फोटो सौजन्य- पीटीआय)
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एक स्त्री सुटकेसवर झोपी गेलेल्या मुलाला ती सुटकेस खेचत पुढे नेत आहे. ही स्त्री पंजाबवरून झाशीमध्ये चालली असल्याची माहिती मिळाली होती. (फोटो सौजन्य- ट्विटर)
बसने उत्तर प्रदेशमध्ये पोहोचण्याआधी मध्य प्रदेशमध्ये थांबलेले असताना केवळ एका केळ्यासाठी भुकेलेल्यांची अशी झुंबड उडाली होती (फोटो सौजन्य- AP)
अहमदाबादहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या गर्दीतील हा एक निरागस फोटो आहे. रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी लागलेल्या ट्रान्सपोर्टच्या रांगेत हे बाळ देखील आईबरोबर होतं. श्रमिक ट्रेनमधून जाण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. (फोटो सौजन्य- Reuters)
गाझियाबादचा असणारा हा एका उत्तर प्रदेशमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या मुलीचा आहे. फोनवर बोलताना तिच्या डोळ्यातील अश्रू स्पष्ट दिसत आहेत. (फोटो सौजन्य- Reuters)
नवी दिल्लाहून उत्तर प्रदेशमध्ये पोहोचतेवेळी एका प्रवासी मजुराने त्याच्या मुलाला कवेत घेतलेला हा फोटो. सीमा ओलांडण्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागली (फोटो सौजन्य- Reuters)
नवी दिल्लीवरून सीमा ओलांडण्यास अडवल्याने या महिलेला रडूच कोसळले. (फोटो सौजन्य- Reuters)
नवी दिल्ली - प्रवासी मजुरांनी ट्रकमध्ये चढण्यासाठी गर्दी केली होती. अक्षरश: मुलं आणि त्यांचे सामान ढकलून ट्रकमध्ये चढवण्यात आलं. टा ट्रक त्यांना त्यांच्या घरी उत्तर प्रदेशमध्ये नेणारा होता (फोटो सौजन्य- Reuters)
नवी दिल्ली - चालून चालून थकल्याने उत्तर प्रदेशमध्ये पोहोचण्याआधी या लोकांनी रस्त्यावरच पाठ टेकलेली ठिकठिकाणी पाहायला मिळत होती (फोटो सौजन्य- Reuters)
अहमदाबाद- प्रवासी मजूर आणि त्यांचे कुटुंबीय रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यासाठी ट्रान्सपोर्टकरता थांबले होते. (फोटो सौजन्- Reuters)
नवी दिल्ली- घरी पोहोचण्याआधी वाटेत थांबल्यावर ही माऊली तिच्या बाळाला थोडसं पाणी पाजत आहे. घरी जाण्याच्या आशेने अनेकांनी सर्व संसार हातात घेत वाट धरली आहे. (फोटो सौजन्य- एपी)
अहमदाबाद- घरी पोहोचवणारी ट्रेन गाठण्यासाठी स्टेशनवर जाण्यासाठी या मजुरांनी रेल्वे ट्रॅकची वाट धरली (फोटो सौजन्य-AP)
ट्रकचा अपघात होऊन डोक्याला जबर मार लागल्यानंतर या इसमाला रक्त थांबण्यासाठी साध्या कपड्याचा आधार घ्यावा लागला (फोटो सौजन्य-एपी)
उत्तर प्रदेश- सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करत चालत जाणाऱ्या या मजुरांच्या डोळ्यात केवळ घरी पोहोचण्याचे स्वप्न दिसत आहे. (सौजन्य- एपी)
नवी दिल्ली (फोटो सौजन्- AP)
नवी दिल्ली- बस टर्मिनसकडे जाताना एक प्रवासी मजूर (फोटो सौजन्य-AP)
नवी दिल्ली- उत्तर प्रदेशमध्ये पोहोचण्यासाठी बस टर्मिनसकडे जाताना प्रवासी मजूर (फोटो सौजन्य-AP)
नवी दिल्ली- उत्तर प्रदेशमध्ये पोहोचण्यासाठी बस टर्मिनसकडे जाताना प्रवासी मजूर (फोटो सौजन्य-AP)
नवी दिल्ली- चिमुकले आणि सारा संसार हातामध्ये घेऊन उत्तर प्रदेशमध्ये पोहोचण्यासाठी बस टर्मिनसकडे जाताना प्रवासी मजूर (फोटो सौजन्य-AP)
नवी दिल्ली- चिमुकले आणि सारा संसार हातामध्ये घेऊन उत्तर प्रदेशमध्ये पोहोचण्यासाठी बस टर्मिनसकडे जाताना प्रवासी मजूर (फोटो सौजन्य-AP)
गाझियाबाद- प्रवासी कामगारांनी बस स्टेशनबाहेर गर्दी केली होती. पहिला 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतरचा हा फोटो आहे. (फोटो सौजन्य- REUTERS/Anushree Fadnavis)
नवी दिल्ली- हजारो प्रवासी मजूर गावी परतण्यासाठी सरकारकडून पुरवण्यात आलेल्या बसमधून जाण्यासाठी बस स्थानकाबाहेर गर्दी करून उभे होते. (फोटो सौजन्य- AP)