पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 69 वा वाढदिवस देशभर 'सेवा दिवस' म्हणून साजरा केला जातोय. यानिमित्त भाजपने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय. तर मोदींनी गुजरातमध्ये आज विविध प्रकल्पांचं उद्घाटन केलं आणि त्यांनी आपल्या आईंचा आर्शीवाद घेतला आणि त्यांच्यासोबत जेवणही केलं. पंतप्रधान मोदी दरवर्षी न चुकता आपल्या वाढदिवसाला आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतात. आणि हिराबेन या आपल्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या दिवशी काही नाणी आणि पैसे भेट म्हणून देतात. ही भेट आपल्यासाठी अमुल्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
प्रत्येक मोठ्या आणि महत्त्वाची कामं करण्याआधी आईचे आशीर्वाद घ्यायला पंतप्रधान मोदी विसरत नाहीत. गरीब कुटुंबात झालेला त्यांचा जन्म, आईचे आशीर्वाद आणि त्यांची मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर आज ते राजकारणात सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचले आहे. त्याचा प्रामाणिकपणा, तत्वनिष्ठता आणि चिकाटी यामुळे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातच्या वडनगर या छोट्याशा गावात झाला. गरीबीची परिस्थिती असल्यानं त्यांनी वडिलांसोबत वडनगर रेल्वे स्थानकात चहा विकण्याचं काम करायला सुरूवात केली. वडिलांना मदत व्हावी म्हणून ते वडिलांच्या कामात मदत करत होते. लहानपणापासून देशसेवा करण्याचं त्यांचं स्वप्न होतं.
पंतप्रधान मोदींनी गुजरात विद्यापिठातून मास्टर ऑफ सायन्समध्ये पदवी प्राप्त केली. शालेय जीवनात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षासाठी नामांकन मिळाले. त्यांनी भाजपचे सरचिटणीस, राष्ट्रीय सचिव, गुजरातचे मुख्यमंत्री अशा अनेक पदांवर सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
भारतीय सैन्यदलात जायचं होतं. मात्र त्यांचं ते स्वप्न राहिलं. त्यांनी जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणे त्यांनी शिक्षण घेतलं. वडिलांपेक्षा अधिक वेळ त्यांचा ग्रंथालयात जायला लागला. वादविवाद करण्यात, चर्चा सत्रांमध्ये ते माहीर होते. अभिनयाची आवड होती.
योग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्माची आवड असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आज जगातल्या अव्वल नेत्यांमध्ये स्थान मिळवलं आहे.