NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / स्मशानात अवतरला स्वर्ग ! बर्थ डे पार्टी ते प्री वेडिंग शूटसाठी होतीय सर्वांची गर्दी, Photos

स्मशानात अवतरला स्वर्ग ! बर्थ डे पार्टी ते प्री वेडिंग शूटसाठी होतीय सर्वांची गर्दी, Photos

स्माशानाचं नाव ऐकताच अनेकांना भीती वाटते. पण, हे स्मशान चक्क पिकनिक स्पॉट बनलं आहे.

113

स्माशानाचं नाव ऐकताच अनेकांना भीती वाटते. स्माशानात जाण्याची कुणाचीही इच्छा नसते.

213

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डिसामधील स्मशान वेगळं आहे. हे स्मशान आता चक्क पिकनिक स्पॉट बनलं आहे.

313

डिसामध्ये बनास नदीच्या काठावर 14 एकर विस्तीर्ण परिसरात हे स्मशान बनवण्यात आलं आहे.

413

हे स्मशान बनवण्यासाठी 5 ते 7 कोटी खर्च आला असून इथं मुलांच्या खेळण्यापासून अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.

513

या स्मशानात लोकं अत्यंसंस्काराबरोबरच वाढदिवस आणि प्री वेडिंग शूटही करायला येतात.

613

डिसा आणि जवळपासच्या नागरिकांसाठी हे स्मशान आता पिकनिक स्पॉट बनलं आहे.

713

येथील भिंतीवर वेगवेगळे पौराणिक प्रसंग दाखवले आहेत.

813

त्याचबरोबर अनेक देवतांच्या मूर्तींचं दर्शनही इथं घेण्याची संधी आहे. या सर्व गोष्टी पाहण्यासाठी मुद्दाम अनेक जण स्मशानात येत आहेत.

913

या स्मशानाचे एखाद्या रिसोर्टसारखे भव्य प्रवेशद्वार आहे.

1013

स्मशानातील अंत्यसंस्काराची जागा आधुनिक पद्धतीनं बनवण्यात आली असून मुलांसाठी खास जागा निश्चित करण्यात आली आहे.

1113

वरिष्ठ नागरिकांसाठी प्रार्थनागृह, पुस्तकालय त्याचबरोबर पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय देखील इथं करण्यात आली आहे.

1213

या स्मशानातील 80 टक्के काम पूर्ण झालं असून ते सध्या परिसरातील आकर्षणाचं केंद्र बनलंय.

1313

फक्त 1 रुपयाच्या टोकनमध्ये इथं कोणत्याही व्यक्तीवर अंत्यसंस्कार करता येतात. ( सर्व फोटो : निलेश राणा, प्रतिनिधी, बनासकांठा)

  • FIRST PUBLISHED :