NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / कुठे गायब होतो प्रवाह, गोदावरीचं गूढ अजूनही कायम, या तज्ज्ञांकडे आहे याचं उत्तर

कुठे गायब होतो प्रवाह, गोदावरीचं गूढ अजूनही कायम, या तज्ज्ञांकडे आहे याचं उत्तर

चित्रकूट, 9 मे : गोदावरी प्रवाहाच्या विशाल जलसाठा असलेल्या दुसऱ्या गुहेतून बाहेर पडणारे पाणी कुंडानंतर बाहेर दिसत नाही. या गुहेत वाहणाऱ्या गोदावरीचे उगमस्थान जाणून घेण्याचा अनेक अभ्यासक आणि तज्ज्ञांनी प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र, याचे गूढ अद्याप कायम आहे. (धीरेन्द्र शुक्ला, प्रतिनिधी)

15

चित्रकूट हे धार्मिक शहर असण्यासोबतच त्याच्या सौंदर्यासाठीही ओळखले जाते. जिथे दररोज हजारो भाविक भेट देण्यासाठी येतात. येथील चित्रकूट धामचा संत-मुनीशी थेट संबंध आहे. पण आजही गोदावरी नदीच्या उगमाचे रहस्य याठिकाणी गुपित आहे. गुहांमधून बाहेर पडणारे गुप्त गोदावरी नदीचे पाणी थोड्या अंतरावर दिसू लागल्यावर गुप्त होते.

25

असे मानले जाते की त्रेतायुगात भगवान श्री राम आणि त्यांचे बंधू लक्ष्मण काही काळ या गुहेत राहिले होते, त्यानंतर देवतागणही येथे आले होते. महंत जगजीवन दास सांगतात की, देवता आणि भगवान रामाचे दर्शन घेतल्यानंतर माता गोदावरी आपल्या जागी परत गेल्या आणि त्यांनी स्वतःला घूंघटने झाकून घेतले.

35

भारत मंदिराचे महंत दिव्य जीवनदास जी म्हणाले, "सतयुगापासून ही गुहा प्रभू श्री रामाची वाट पाहत होती. त्रेतायुगातील वनवासात जेव्हा भगवान चित्रकूटला आले, तेव्हा त्यांनी काही काळ गुप्त गुहांमध्ये घालवला. त्याच वेळी श्री राम यांना भेटायला याठिकाणी देवतांचाही वास झाला. सर्व देवता प्रभू रामाला भेटण्यासाठी गोदावरी गुहेच्या आत पोहोचले. आजही गुहेच्या आत दगडाच्या सिंहासनाच्या आकारात एक खडक कापलेला आहे. आजही ती जागा गुहेच्या आत आहे."

45

निसर्गाचा अनमोल वारसा असलेली गुप्त गोदावरी हे असे ठिकाण आहे, जिथे पर्यटकांचे भान हरपून जाते. निसर्गाच्या अनोख्या कारागिरीने लेण्यांमध्ये कोरीव काम केले आहे. एक गुहा कोरडी आहे. माता गोदावरी सोबतच इतर देवतांची इथे स्थापना आहे आणि राजा इंद्राचा मुलगा जयंत आजही खटखटा चोराच्या रूपात लटकत आहे.

55

उन्हाळ्यात गुहेचे वातावरण थंड राहते. असेही मानले जाते की, भगवान रामाने स्वतः सांगितले होते की, जो भक्त खऱ्या मनाने गुहेत येऊन भगवान राम, लक्ष्मण आणि माता सीता यांची पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. (या कथेतील तथ्य गृहीतकांवर आणि लोकप्रिय दंतकथांवर आधारित आहे, न्यूज18 याचा दावा करत नाही.)

  • FIRST PUBLISHED :