NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / देवाची आराधना करताना माजी आमदारांनी सोडले प्राण; CCTV मध्ये कैद झाला संपूर्ण प्रसंग

देवाची आराधना करताना माजी आमदारांनी सोडले प्राण; CCTV मध्ये कैद झाला संपूर्ण प्रसंग

नेहमीप्रमाणे सकाळी माजी आमदार देवाची प्रार्थना करण्यासाठी मंदिरात आले होते, देवाच्या मूर्तीसमोर उभे असताना अचानक...

16

मध्य प्रदेशातील बैतूलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मृत्यू कधी येईल याबाबत कोणीच काही सांगू शकत नाही. बैतूलमध्ये एमएलए विनोद डागा हे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. देवाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभे असताना त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाचे सर्व दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

26

गुरुवारी धनत्रयोदशीच्या दिवशी नेहमीप्रमाणे बैतूलचे माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी प्रदेश कोषाध्यक्ष विनोद डागा जैन दादावाडी स्थित मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. पहिल्यांदा त्यांनी मंदिरात भगवान पार्श्वनाथ यांची पूजा केली. यानंतर दादा गुरुदेव मंदिरात परिक्रमा केली आणि पूजेला सुरुवात केली. पूजा संपताच त्यांनी दादा गुरुदेव यांच्या चरणावर डोकं टेकलं, त्यानंतर काही क्षणात ते खाली कोसळले. पुढील काही सेंकदातच त्यांचं निधन झालं.

36

त्यावेळी दर्शन करण्यासाठी एक लहान मुलगी मंदिरात आली आणि तिने विनोद डागा जमिनीवर पडलेले पाहिले. तिने याबाबत मंदिरातील भटजींना सांगितलं. भटजींसह जवळील लोकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांना जवळील रुग्णालयान घेऊन जाण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विनोद डागा बुधवारी रात्री भोपाळमधून बैतूलला आले होते. निवडणुकीच्या बैठकीत सामील होण्यासाठी भोपाळला गेले होते.

46

त्यांना निधनाच्या बातमीबद्दल अद्यापही लोकांना विश्वास वाटत नाही. नेहमी स्वस्थ असणारे विनोद यांच्या अचानक निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या अत्यंयात्रेला मोठ्या संख्येने लोक सामील झाले होते.

56

मंदिराचे पुजारी ओम प्रकाश त्रिपाठी म्हणाले की, विनोद डोगा नेहमीप्रमाणे पूजा करण्यासाठी मंदिरात आले होते. शांती पार्श्वनाथ भगवानची पूजा केल्यानंतर गुरुवेद यांची पूजा केल्यानंतर ते खाली कोसळले. एका मुलीने याबाबत माहिती दिली. ते मोठे भाग्यवान होते, यासारखी मुक्ती प्रत्येकाला मिळत नाही. आम्ही याबाबत शास्त्रांमध्ये वाचल होतं, मात्र प्रत्यक्षात कधीच पाहिलं नव्हतं.

66

डागा कुटुंबाचे जवळील नातेवाईन उषभ गोठी म्हणाले की, नक्कीच ही अत्यंत हैराण करणारी बाब आहे. विनोद यांना मोक्ष मिळाला आहे. आम्ही गुरू महाराजांकडून ऐकलं होतं की, अशी मुक्ती काहींना मिळते. मात्र आज प्रत्यक्षात पाहिलं. अशा प्रकारे मुक्ती मिळणं कोणालाही शक्य होत नाही. त्यांनी नक्कीच गेल्या जन्मात पुण्यकर्म केलं होतं, ज्यामुळे आज त्यांना असा मृत्यू मिळाला.

  • FIRST PUBLISHED :