NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश /  ‘चांद्रयान-3’साठी बंगळुरुजवळ तयार होणार चंद्रासारखे खड्डे, ISROचा प्लान तयार!

 ‘चांद्रयान-3’साठी बंगळुरुजवळ तयार होणार चंद्रासारखे खड्डे, ISROचा प्लान तयार!

चंद्राच्या पृष्ठ भागावर लँडर आणि रोव्हर उतरण्यासातठी यावेळी खास काळजी घेण्यात येत आहे.

19

देशात कोरोनाचं संकट असतांनाही भारतीय अवकाश संशोधन संस्था ISROचं काम थांबलेलं नाही. ‘चांद्रयान-3’च्या (Chandrayaan-3) लाँचिंगची जोरात तयारी सुरु आहे. 2021मध्ये हे यान चंद्राकडे झेप घेणार आहे.

29

या मोहिमेत लँडर आणि रोव्हर चंद्रावर जाणार आहेत. चंद्राभोवती फिरणाऱ्या ‘चांद्रयान-2’च्या ऑरबिटरशी त्यांचा संपर्क प्रस्थापित केला जाणार आहे.

39

चंद्राच्या पृष्ठ भागावर लँडर आणि रोव्हर उतरण्यासातठी यावेळी खास काळजी घेण्यात येत आहे. इस्रोने त्यासाठी तयारीला सुरुवातही केली आहे.

49

बंगळुरुजवळ 215 किमी अंतरावर त्यासाठी एका खेड्याजवळ जागा निवडण्यात आली आहे. तिथे चंद्रावर जसे खड्डे असतात त्याच प्रमाणे खड्डे तयार करण्यात येणार आहेत. याबाबतचं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

59

त्या खड्ड्यांवर लँडर आणि रोव्हर सुरक्षित उतरविण्याचा सराव केला जाणार आहे.

69

चांद्रयान-2 ही मोहिम शेवटच्या टप्प्यात यशस्वी ठरली नव्हती. त्या सगळ्या चुकांमधून शिकून इस्रोने नवी योजना तयार केली असून यावेळी सर्व गोष्टींची अधिक काळजी घेतली जात आहे.

79

कोरोना संकटामुळे इस्रोच्या कामावरही थोडा परिणाम झाला आहे. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा या उड्डाणांना विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

89

इस्रोला ज्या कंपन्या सामानांचा पुरवढा करतात त्याला विलंब होत असल्याचं कारण दिलं जात आहे. मात्र सर्व कामे ही नियोजित वेळेप्रमाणेच करण्याचा इस्रोचा प्रयत्न आहे.

99

मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पर्यायी योजना तयार असल्याचंही इस्रोने म्हटलं आहे.

  • FIRST PUBLISHED :