जुनागडमध्ये 24 तासात 10 इंच पाऊस झाल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले असून, शेतांचेही मोठं नुकसान झालं आहे.
जुनागडमध्ये मुसळधार पावसामुळे ओजट नदीचा किनारा वाहून गेला आहे. बामणसाजवळील नदीच्या बंधाऱ्याला तडे गेले आहेत. नदीचे पाणी शेतात शिरल्याने भुईमुगाचे नुकसान झाले.
जुनागडचे हसनापूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. गिरनारमध्ये मुसळधार पावसामुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे सखल भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जुनागडमधील 3 धरणे पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झाली आहेत.
सौराष्ट्रात मुसळधार पावसामुळे ओजट नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांच्या शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. हजारो एकर शेतजमीन वाहून गेली आहे, तर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गुजरातमधील सर्व 33 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी पावसाने सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.