NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / मणिपूरच्या शेतकऱ्याची लेक बनवी मिस फेमिना 2023; नंदिनी गुप्ताची प्रेरणादायी कहाणी

मणिपूरच्या शेतकऱ्याची लेक बनवी मिस फेमिना 2023; नंदिनी गुप्ताची प्रेरणादायी कहाणी

गेल्या अनेक वर्षांपासून भारतात फेमिना मिस इंडिया स्पर्धा घेतली जाते. मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी ही स्पर्धा मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देते. मिस इंडिया झालेल्या अनेक जणी आतापर्यंत बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्री झाल्या आहेत. यंदाचा म्हणजेच 2023चा मिस इंडियाचा किताब राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातल्या नंदिनी गुप्ता हिनं मिळवला आहे. कोटा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून आलेल्या नंदिनी गुप्ता हिचा इथपर्यंतचा प्रवास जाणून घेऊ या.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
    Last Updated: April 30, 2023, 21:32 IST
17

मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये यंदा फेमिना मिस इंडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात नंदिनी विजेती ठरली. ती जिंकल्यामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. नंदिनीचे आई-वडील आणि छोटी बहीण तिच्यासोबत मणिपूरमध्येच आहेत, तर इतर नातेवाईक कोटामध्ये मिठाई वाटून आनंद साजरा करत आहेत.

27

राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात रामपुरा भागात असलेल्या जुन्या भाजी मंडई परिसरात नंदिनी तिच्या कुटुंबीयांसोबत राहते. तिचे वडील सुमित गुप्ता बिल्डर असून शेतीही करतात. आई रेखा गुप्ता गृहिणी आहे. नंदिनीची छोटी बहीण अनन्या गुप्ता सध्या शिक्षण घेत आहे.

37

नंदिनीने मुंबईतून बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचं शिक्षण घेतलं आहे. त्याआधीचं शिक्षण तिनं कोटातल्या माला रोडवर असलेल्या मिशनरी शाळेतून घेतलं आहे. नंदिनीचे वडील सुमित गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, गेले 45 दिवस ही स्पर्धा सुरू होती. मणिपूर पर्यटन विभागाने स्पर्धेचं आयोजन केलं होतं.

47

नंदिनीने 3-4 वर्षांची असतानाच मिस इंडिया स्पर्धेत सहभागी होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे. तेव्हापासून ती कॅटवॉक करायची व टीव्हीवर ते कार्यक्रम पाहायची. विशेष म्हणजे नंदिनीने यासाठी कोणतेही क्लास लावले नाहीत किंवा प्रशिक्षण घेतलं नाही.

57

नंदिनीच्या मते फेमिना मिस इंडिया ही केवळ सुरुवात आहे. यापुढे मिस युनिव्हर्सचा मुकुट मिळवणं हे तिचं स्वप्न आहे. जशी संधी मिळेल, तसं चित्रपट क्षेत्रात नक्की काम करणार असल्याचं तिनं सांगितलंय.

67

एखाद्या ब्रँडचं प्रमोशन, ब्रँड अँबेसेडर किंवा चित्रपटात करिअर करणं या सगळ्याचा ती विचार करते आहे. कारण याआधी ती केवळ स्पर्धक होती; मात्र आता ती फेमिना मिस इंडिया बनली आहे. तिच्यासाठी करिअरचे अनेक पर्याय आता खुले झाले आहेत.

77

फेमिना मिस इंडिया स्पर्धा 45-50 दिवस सुरू होती. यात जवळपास सगळ्या राज्यांमधून स्पर्धक आले होते. त्या सगळ्यांना मागे टाकत नंदिनी गुप्ता हिने मान पटकावला. याआधीची मिस इंडिया सिनी शेट्टी हिने नंदिनीला मुकुट घातला. दिल्लीची श्रेया पूंजा फर्स्ट रनर अप, तर मणिपूरची थौनाओजम स्ट्रेला लुवांग सेकंड रनर अप ठरली.

  • FIRST PUBLISHED :