जमुई जिल्ह्यात लहान भावाला मोठ्या भावाच्या मेहुणीसोबत प्रेम झाले. असे सांगितले जात आहे की, दोघांमध्ये एका वर्षापासून प्रेमप्रकरण सुरू होते. याचदरम्यान, दोघांनी गेल्या मंगळवारी 18 तारखेला दोघांच्या गावाजवळच्या हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरवले.
दोन्हीही जण ठरल्यानुसार एकमेकांना भेटायला आले. मात्र, ही बाब त्यांच्या घरच्यांना माहिती झाली आणि त्यांनी त्या हॉटेलमध्ये धाव घेत त्यांना एकाचवेळी पकडले. यानंतर सर्वानुमते दोघांचे लग्न लावून देण्यात आले. शहरातील पतनेश्वर मंदिरात सायंकाळी हा विवाहसोहळा पार पडला. ही घटना जमुईच्या सदर ठाणे क्षेत्राच्या अगहरा गावातील आहे.
नातेवाईक तरुणाचे या तरुणीच्या घरी येणे-जाणे होते. त्यानंतर वर्षभरात दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, जमुई येथील हॉटेलमध्ये एक प्रेमी युगल पोहोचले. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनीही हॉटेलमध्ये धाव घेतली. यावेळी याठिकाणी एकच गोंधळ उडाला. नंतर त्याच दिवशी संध्याकाळी दोघांचे लग्न लावून देण्यात आले.
मनीषा आणि आनंद असे या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. मनीषाला भेटण्यासाठी आनंद अनेक वेळा धनबादवरुन जमुईला यायचा. दोघेही एकांतात भेटू लागले. दरम्यान, आनंदचा स्वतःचा मोठा भाऊ जो रेल्वेत नोकरीला आहे, त्याने मनीषाशी लग्न करण्याची चर्चा दोन्ही परिवार करू लागले होते.
यामुळे त्यानंतर आनंद आणि मनीषा या दोघांच्याही अडचणीत वाढ झाली होती. याचदरम्यान, दोघांनी गेल्या मंगळवारी 18 तारखेला दोघांच्या गावाजवळच्या हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरवले. दोन्हीही जण ठरल्यानुसार एकमेकांना भेटायला आले. मात्र, ही बाब त्यांच्या घरच्यांना माहिती झाली आणि त्यांनी त्या हॉटेलमध्ये धाव घेत त्यांना एकाचवेळी पकडले. यानंतर सर्वानुमते दोघांचे लग्न लावून देण्यात आले.
लग्नानंतर प्रियकर आनंदने सांगितले की, मनीषा आणि तो दोघांमध्ये वर्षभरापासून एकमेकांवर प्रेमसंबंध होते. मंगळवारी तो मनीषाला भेटायला आला होता. तिथं तिच्या घरच्यांना ही बाब कळली.
त्यानंतर सर्वानुमते त्यांचे लग्न लावून देण्यात आले. दरम्यान, गेल्या एक वर्षापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे आनंदची प्रेयसी मनीषाने सांगितले नाही.