कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलमट्टी धरणाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
विद्युत रोषणाईमुळे धरणाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.
तब्बल 124 TMC साठवणक्षमता असलेले हे धरण सध्या मोठ्या क्षमतेने भरले असून धरणातून तब्बल 2 लाखाहून अधिक क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.
2005 साली बांधण्यात आलेले हे धरण कर्नाटकची वेगळी ओळख निर्माण करत आहे. संध्याकाळच्या सुमारास या धरणावर असलेल्या 26 दरवाज्यावर नयनरम्य अशी विद्युत रोषणाई केली जाते. जेव्हा धरणाचे सर्व दरवाजे उघडले जातात तेव्हा ही विद्युत रोषणाई सर्वाचेच लक्ष वेधून घेते..
अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती टळणार आहे. हा विसर्ग सुरू झाल्याने पंचगंगेची पाणीपातळी ओसरायला सुरुवात झाली आहे.