महाचक्रीवादळ अम्फनने किती हाहाकार उडवला, याचं चित्र आता वादळ शमल्यावर पुढे येत आहे. हे फोटो पाहून भरेल धडकी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं अम्फन हे भीषण चक्रीवादळ बुधवारी किनाऱ्याला धडकलं.
या वादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठा विध्वंस केला. ताशी 180 किमी वेगाने वारे वाहात होते.
या वादळात पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 72 लोकांचा बळी गेला असल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.
अम्फान वादळाचा फटका कोलकाता विमानतळाला बसला. 185 KM किमी वेगानं आलेल्या वाऱ्यामुळं कोलकाताच्या विमानतळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
असा विध्वंस कधी पाहिला नव्हता, असं खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
संध्याकाळी 5 नंतर कोलकात्यात वाऱ्यांचा वेग वाढला आणि रात्री 9 पर्यंत तुफान वाऱ्यासह पाऊस कोसळत होता.
अनेक घरांचं झाडं पडून नुकसान झालं. वीज गेली, छप्पर उडाली.
प्रसिद्ध हावडा ब्रीजवर दुपारी मिट्ट काळोख होता.
अम्फन चक्रीवादळ दुपारी अडीच वाजता पूर्व किनारपट्टीवर धडकलं. पहिल्या चार तासांतच या वादळाने कहर केला.
विमानतळावरील अनेक इमारतींचेही नुकसान झाले आहे.
दमदम विमानतळाचा परिसर नदीसारखा दिसत होता.
विमानतळाची झाली नदी
अनेक कार्यालयांची छप्पर उडाले.
विमानतळ आणि विमानांचंही नुकसान झालं आहे.
अपरिमित वित्तहानी या महाचक्रीवादळाने केली आहे.