NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा नवा उच्चांक, 24 तासांत 94 हजार जणांना मिळाला डिस्चार्ज!

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा नवा उच्चांक, 24 तासांत 94 हजार जणांना मिळाला डिस्चार्ज!

नवे रुग्ण आढळणाऱ्या राज्यांमध्ये देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. रुग्ण संख्या कमी कशी करावी याची सरकारला आता चिंता आहे.

17

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच काही दिलासादायक आकडेवारीही समोर आली आहे. दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांनी उच्चांक गाठला आहे.

27

गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 94,612 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

37

त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची देशातली संख्या ही 43 लाख झाली आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट 79.68 टक्के एवढा झाला आहे.

47

नवे रुग्ण आढळणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 23 हजारांच्या आसपास नवे पेशंट आढळून येत आहेत.

57

महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये देशातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी 60 टक्के पेशंट आहेत.

67

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने 52 लाखांचा आकडा पार केला आहे. तर मृत्यूची संख्या ही 85 हजारांवर पोहोचली आहे.

77

गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 96 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत.

  • FIRST PUBLISHED :