NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / भारतीय रेल्वेनंही सुरू केलं आयसोलेशन वॉर्ड, पाहा एक्स्प्रेसमधील INSIDE PHOTO

भारतीय रेल्वेनंही सुरू केलं आयसोलेशन वॉर्ड, पाहा एक्स्प्रेसमधील INSIDE PHOTO

देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने आता रेल्वेच्या डब्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतरीत केलं आहे.

17

देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने आता रेल्वेच्या डब्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतरीत केलं आहे. उत्तर रेल्वेकडून जगाधरी वर्कशॉपमध्ये 28 डब्यांत आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. गरज पडल्यास असे 3 लाख आयसोलेशन बेड होऊ शकतात.

27

रेल्वेच्या 28 नॉन एसी कोचला आयसोलेशन वॉर्ड केलं आहे. जगाधारी वर्कशॉपमध्ये पाच आणि एएमव्हीमध्ये 5 कोच आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. दोन्ही वर्कशॉप्स प्रोटोटाइप कोच फायनल स्टेजमध्ये आहेत. 28 कोच 6 एप्रिलपर्यंत तयार करण्यात येतील.

37

प्रत्येक कोचमध्ये शेवटच्या पार्टिशनमधून दरवाजा काढण्यात आला आहे. तसंच प्रत्येक कोचच्या शेवटी एक इंडियन स्टाइल टॉयलेटचं रुपांतर बाथरूममध्ये कऱण्यात आलं आहे.

47

टॉयलेटमध्ये बादली, मग आणि सोप डिश ठेवली आहे. तसंच मधले बर्थही काढण्यात आले आहेत.

57

रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार कोचमध्ये अप्पर बर्थवर चढण्यासाठी असलेल्या शिड्या काढल्या आहेत. तसंच प्रत्येक केबिनमध्ये मेडिकल इक्विपमेंटसाठी बॉटल होल्डर लावण्यात आले आहेत.

67

डब्यांमध्ये चार्जिंग स्लॉटही दुरुस्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय प्रत्येक केबिनमध्ये प्लास्टिक पडदे लावण्यातची तयारीह केली जात आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपर्यंत देशात 873 रुग्ण आढळले आहेत. यातील 66 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

77

रेल्वेच्या डब्यांचा आयसोलेशन वॉर्डसाठी वापर करता येईल असा सल्ला बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरून दिला होता. आता त्याचपद्धतीने रेल्वेनं कामही सुरु केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :