सोशल मीडियावर सतत चर्चेत असणाऱ्या बी. चंद्रकला या IAS ऑफिसरच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. (सर्व फोटो सौजन्य: फेसबुक)
सध्या उत्तर प्रदेशात काम करत असलेल्या बी. चंद्रकला यांच्यावर खाण घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप आहे.
बी. चंद्रकला यांनी त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिलेली नाही. त्यांची अनेक ठिकाणी बेनावी संपत्ती असण्याचीही शक्यता आहे.
बेनावी संपत्ती आणि खाण घोटाळ्यासंदर्भातला आरोप यामुळे सीबीआयकडून वारंवार त्याच्या संपत्तीवर छापा मारण्यात येत आहे.
बी. चंद्रकला फेसबुकवर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. त्यामुळेच फेसबुकवर त्यांचे 85 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
फेब्रुवारी 2016 मध्ये बी चंद्रकला या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी त्यांचा फोटो काढणाऱ्या एका 18 वर्षांच्या मुलाला जेलमध्ये टाकलं होतं.
या अटकेसंदर्भात विचारण्यासाठी एका रिपोर्टने चंद्रकला यांना फोन केला तेव्हा त्यांनी आपल्या उत्तरातून वाद ओढवून घेतला होता.
चंद्रकला यांनी त्या रिपोर्टरच्या घरी एक अज्ञात व्यक्ती पाठवण्याची धमकी दिली होती.
मूळ हैद्राबादच्या असणाऱ्या चंद्रकला यांची पहिल्यांदा युपीच्या बुलंदशहर इथं पोस्टिंग झाली होती.
खराब रस्ते बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सवरील कारवाईमुळे बी चंद्रकला आधी चर्चेत आल्या होत्या.
या धडक कारवाईमुळे त्यांची मथुरा इथं बदली करण्यात आली.
चंद्रकला यांची पहिली बदली ही अवघ्या 129 दिवसांत करण्यात आली होती.
त्या मथुराच्या दुसऱ्या महिला जिल्हादंडाधिकारी ठरल्या.
चंद्रकला यांनी अलाहबाद इथं SDM आणि CDO या पदांवरही काम केलं आहे.
पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप होत आहेत.
या आरोपांनंतर आता चंद्रकला यांच्या संपत्तीवर सीबीआयने छापेमारी सुरू केली आहे.
या छाप्यांमध्ये काही महत्त्वाची कागपत्रही सीबीआयच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
एकूणच सध्या बी चंद्रकला यांच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे.
यासंदर्भात बी चंद्रकला यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पुढे वाचा या एका लग्नानं आणि लग्नातल्या 'या' साडीनं गाजवलं वर्ष
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचं बहुचर्चित लग्न शाही थाटात पार पडलं. गुजराती रीतीरिवाजांप्रमाणे सर्व विधी झाले.
सेलेब्रिटी आणि नातेवाईकांच्या गोतावळ्यात पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा झाला. ईशा लग्नासाठी कुठली साडी नेसणार याबाबत उत्सुकता होती.
नववधू ईशाने 35 वर्षांपूर्वी आई नीता अंबानी यांनी लग्नात नेसलेली साडी नेसून आश्चर्याचा धक्का दिला. आईची साडी नेसून तिच्याविषयी असलेली माया आणि प्रेम ईशानं दर्शवलं.
बहीण ईशाला तिच्या दोन्ही भावांनी अशा पद्धतीनं मांडवात आणलं.
उदयपूरमध्ये संगीत आणि सर्व रितीनंतर मुंबईत ईशा अंबानी यांचं लग्न झालं. त्यानिमित्त अंबांनींच्या निवासस्थानी अशी सजावट करण्यात आली होती.
दिग्गज पाहुण्यांमध्ये माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जीसुद्धा आले होते.
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी देखील लग्नाला उपस्थित होते. त्यांचं स्वागत मुकेश यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांनी केलं.
अभिनेते आणि पाणी फाऊंडेशनचे कर्तेधर्ते आमिर खान आणि किरण राव यांचाही समावेश पाहुण्यांमध्ये होता.
नवपरिणित सेलेब्रिटी दांपत्य प्रियांका आणि निकदेखील लग्नात हजर होते.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या सोबत त्यांची मुलगी आराध्यादेखील लग्नाला आले होते. रेड अॅण्ड ब्लॅक रंगाच्या कपड्यांमध्ये बच्चन परिवार सुंदर दिसत होता.
मुंबईतील वांद्रा-कुर्ला काँप्लेक्सच्या जिओ गार्डनमध्ये स्वागत समारंभ झाला.
बीकेसीचं जिओ गार्डन फुलांच्या माळांनी सुंदर रित्या सजवण्यात आलं होतं.
ईशा अंबानी यांच्या लग्नासाठी बॉलिवूडच्या बिग बींपासून ते सर्व दिग्गज मंडळी आली होती.
ईशा अंबानी यांना आशिर्वाद देण्यासाठी अमिताभ यांच्यासह त्यांची पत्नीदेखील उपस्थित आहे.
लग्न सभारंभासाठी अनेक व्यवसायिक मंडळी आणि बॉलिवूडमधील स्टार मंडळीदेखील उपस्थित आहेत.
बहिणीच्या लग्नासाठी आकाश अंबानीने घोड्यावर स्वार होऊन लग्नाचं ठिकाणी गाठलं.
त्यासोबतच अनंत अंबानीदेखील घोड्यावर सवार होऊन लग्न कार्यक्रमात शानदार एण्ट्री घेतली.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपली पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसह या लग्नसोहळ्याला हजर राहिला.
यावेळी ती खास हजेरी होती ती थलावाईची...रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी रजनीकांत हे आपल्या पत्नीसह या सोहळ्याला पोहोचले
काळ्या रंगाच्या सूटमध्ये निक जोनस फार डॅशिंग दिसत आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट या लग्नसोहळ्याला आली होती. ट्रेडिशन लूकमध्ये आलिया पाहण्यास मिळाली
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या शाही लग्नसोहळ्याला दिग्गज अभिनेते रजनीकांत यांनी सपत्नीक हजेरी लावली.