NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / मोडून पडला संसार...! आसाममध्ये पुराचा हाहाकार, मन हेलावून टाकणारे PHOTO

मोडून पडला संसार...! आसाममध्ये पुराचा हाहाकार, मन हेलावून टाकणारे PHOTO

यावर्षी देखील आसामला पुराचा फटका बसला आहे. मन हेलावून टाकणारे काही फोटो आसाममधून समोर येत आहे. युनेस्कोने जागतिक संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या आसामच्या काझिरंगा राष्ट्रीय अभयारण्यालाही पुराचा जोरदार फटका बसला आहे.

17

आसाममध्ये मुसळधार पावसाने (assam flood ) पुराचा हाहाकार सुरू आहे. पुरामुळे सुमारे 20 लाख नागरिकांना फटका बसला आहे. यात सगळ्यात प्रभावित आहे ब्रम्हपुत्रा नदीचे (Brahmaputra River) पात्र. आसाममधील पुराचे फोटो मन हेलावून टाकणारे आहेत. फोटो सौजन्याने ट्विटर /@HalkaTedha

27

आसामध्ये जिथे जिथे नजर जात आहे, तिथे फक्त आणि फक्त पाणी आहे. घरांमध्ये राहणारी लोकं सध्या छतांवर आहेत. काही भागांत पाण्याचा स्तर कमी झाला असला तरी, लोकांना आपल्याच घरात राहणं नशीबात नाही आहे. फोटो सौजन्याने ट्विटर /@HalkaTedha

37

आसामला दरवर्षी पुराचा सामना करावा लागतो. गेल्या काही वर्षांपासून, दरवर्षी आसामला पुराचा तडाखा बसत आहे. आसाम हे असे एक राज्य आहे जे पूर्णपणे नदी खोऱ्यावर वसलेले आहे. फोटो सौजन्याने: ट्विटर /@DrSunilKumar_

47

पुरामुळे घरं उद्धवस्त झाली, पिकांचे नुकसान झाले. बर्याोच ठिकाणी रस्ते व पूल तुटले. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की आतापर्यंत105 लोकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 26 जण भूस्खलनामुळे मरण पावले आहेत. फोटो सौजन्याने ट्विटर / @GoswamiUdipta

57

पावसाळ्याच्या दिवसांत पूर तसंच दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे लोकांना आपली राहती घरं सोडून मदत केंद्रामध्ये आश्रयाला जावे लागत आहे. फोटो सौजन्य ट्विटर/@GoswamiUdipta

67

आसामच्या सॅटेलाइटवरून काढलेल्या या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, जमिनीवर फक्त पाणी पाणी आहे. फोटो सौजन्य ट्विटर/@Folitically

77

युनेस्कोने जागतिक संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या आसामच्या काझिरंगा राष्ट्रीय अभयारण्यालाही पुराचा जोरदार फटका बसला आहे. मंगळवारी हे संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेलं. यामध्ये किमान 51 प्राण्यांची जिवीतहानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. फोटो सौजन्य ट्विटर / @kaziranga_

  • FIRST PUBLISHED :