शेख सलाम, प्रतिनिधी न्यूज 18 : वऱ्हाड्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भयंकर अपघात झाला आहे.
लग्नाचा आनंद क्षणात दु:खात बदलला आणि होत्याचं नव्हतं झालं. या अपघातानं कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
वऱ्हाड्यांनी भरलेली बस दरीत कोसळली, चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 15 जखमी आहेत. त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
लग्नाच्या रिसेप्शनला जाण्यासाठी काकीनाडा इथून एक बस भाड्याने घेतली होती.
ड्रायव्हरला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.