अहमदाबाद शहरातील बरेजा गावातून एक दुखद घटना समोर आली आहे. गॅस सिलिंडर लीक झाल्यामुळे घरात स्फोट झाला आणि यात 10 जणं जखमी झाले. ज्यातील 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकाच खोलीत मजूर कुटुंबातील दहा जणं राहत होते.
बरेजा गावात मंगळवारी रात्री एका कुटुंबात हाहाकार उडाला. मजुरीसाठी गुजरात आलेल्या एका कुटुंबातील दहा जणं एकाच खोलीत राहत होते. यादरम्यान कुटुंबातील दहा सदस्य एकाच खोलीत झोपले होते. यादरम्यान कुटुंबातील एका सदस्याला जाग आली. आणि अचानक काहीतरी कामासाठी लाइटचा स्विच ऑन केला.
यामध्ये सर्वजण जखमी झाले होते. त्यांना तत्काळ उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आलं. या घटनेत जखमी 7 सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित सदस्यांवर उपचार सुरू आहेत.
मृतांची नावं...1. रामप्यारी बाई अहिरवार (डी. 56) 2. राजूभाई अहिरवार (डी. 31) 3. सोनू अहिरवार (डी. 21) 4. वैशाली अहिरवार (डी. 7) 5. नितेश भाई अहिरवार (डी. 6) 6. पायल बेन अहिरवार (डी. 4) 7. आकाश भाई अहिरवार (डी. 2)
यापैकी तिघेजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. हे कुटुंब मध्य प्रदेशचं असल्याचं सांगितलं जात आहे.