NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / मुंबईतील 'या' रिक्षाचा थाटच और, प्रत्येक प्रवासी पडतो प्रेमात! पाहा Photos

मुंबईतील 'या' रिक्षाचा थाटच और, प्रत्येक प्रवासी पडतो प्रेमात! पाहा Photos

Mumbai Auto Rikshaw : मुंबईच्या रस्त्यावर धावणाऱ्या या ऑटो रिक्षामध्ये बसलेला प्रत्येक प्रवासी यामधील सुविधा पाहून आनंदी होतो.

18

मुंबईतील काही ऑटो रिक्षा चालक ग्राहकांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी काही सोयी करतात. याच पद्धतीची एक भन्नाट रिक्षा सध्या मुंबईच्या रस्त्यावर धावत आहे.

28

तुम्ही कुर्ला, अंधेरी, वांद्रे या भागात फिरत असाल तर कदाचित तुम्ही ही रिक्षा पाहिली असेल.

38

सत्यवान गीते यांची ही रीक्षा आहे. या रिक्षामध्ये फोन चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉईंट, डेकस्टॉप मॉनिटर, पिण्यासाठी शुद्ध पाणी, हात धुण्यासाठी वॉश बेसिन यासारख्या सुविधा आहेत.

48

गीते यांनी रिक्षामध्ये झाडांच्या कुंड्याही ठेवल्या आहेत. त्यांना फुलंही येतात. ती पाहून प्रवासी प्रसन्न होतात.

58

अनेक महिलांचा, मुलींना मेकअप करण्यास वेळ मिळाला नाही तर या रिक्षात बसून तुम्ही आरामात मेकअप करू शकता. यासाठी इथं मेकअप बॉक्स आणि आरसा आहे.

68

सत्यवान यांनी त्यांच्या रिक्षामध्ये प्रवाशांना गार वाटावं म्हणून पंखा बसवलाय. त्याचबरोबर त्यांनी तोंड धुण्यासाठी वॉश बेसिनचीही सोय केलीय.

78

मुंबईतल्या वाहन चालकांचे प्रबोधन करण्याचं अवघड काम गीते करतात. त्यांनी या रिक्षावर वाहतुकीचे नियम लिहिले आहेत.

88

हे नियम वाचून आणि रिक्षामधील सर्व प्रकारचे सोयी, त्याचं वेगळेपण पाहून प्रत्येक ग्राहक प्रसन्न होतो, असा अनुभव त्यांनी सांगितला.

  • FIRST PUBLISHED :