मुंबई: मुंबई नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते. आजही अशाचं एका आगळ्यावेगळ्या गोष्टीमुळे मुंबईची चर्चा होत आहे. ती गोष्ट म्हणजे मुंबईतील मध्य रेल्वेचं माटुंगा स्थानक संपूर्ण गुलाबी रंगात रंगवण्यात आलं आहे.
हे रेल्वे स्थानक फक्त महिला कर्मचाऱ्यांकडून सांभाळल जातं. याठिकाणी सर्व महिलाच काम करतात.
मुंबईची लाईफलाईन सांभाळणाऱ्या या महिलांच्या सन्मानासाठी रेल्वे प्रशासनाने हे माटुंगा रेल्वे स्थानक गुलाबी रंगात रंगवलं आहे.
ह्या आगळ्यावेगळ्या स्थानकाची नोंद 'लिम्काबुक' मध्ये सुद्धा करण्यात आली आहे.
येथे काम करणाऱ्या महिलांचा खऱ्या अर्थाने आज महिला दिन साजरा झाला असं म्हणावं लागेल. संपूर्ण माटुंगा स्थानक गुलाबी रंगात न्हाऊन निघालं आहे.
महिला सबलीकरणाचे संदेश देत विविध भित्तीचित्रे सुद्धा याठिकाणी रेखाटण्यात आली आहेत.