मुंबईमध्ये शुक्रवारी तृतीयपंथीयांनी वार्षिक पिंक रॅली काढली होती. किन्नर माँ ट्रस्टने या रॅलीचं आयोजन केलं होते.
ऑगस्ट क्रांती मैदानापासून ते गिरगांवपर्यंत पिंक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
तृतीयपंथी समाजाने पिंक रॅलीमध्ये विवध सामाजिक संदेश दिले नशाबंदी, स्वच्छता याचं महत्त्व सांगणारे फलक या रॅलीत सहभागी असणाऱ्यांच्या हातामध्ये होते.
सर्व तृतीयपंथी गुलाबी कपडे घालून या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी या रॅलीच्या माध्यमातून समाजात त्यांच्याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
रॅलीत सहभागी मंडळींनी टाळ्या आणि लेझीमच्या ठेक्यावर ताल धरला होता. त्यांचे नृत्य सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं.
सौंदर्य स्पर्धा जिंकलेली तृतीयपंथीय देखील या रॅलीत जागृती करण्यासाठी सहभागी झाली होती.