प्रतिनिधी मोहन जाधव : मुंबई गोवा महामार्गावर टँकरला अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन किलोमिटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर दासगाव गाव हद्दीत हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
हा टँकर मुंबईहुन महाड MIDC मध्ये जात होता अशी माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
रसायन वाहून नेणाऱ्या टँकरला दास गावाजवळ अपघात झाला. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली.
महामार्गावर 2 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. टँकर मध्ये ज्वालाग्राही रसायन असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव टँकर वर पाणी मारून मदत कार्य करण्यात आले.
सुदैवाने अपघातात कुणीही जखमी झाले नाही. क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला करण्याचे काम सुरू आहे.