NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / COVID-19: महाराष्ट्रात 'एंट्री' करण्यासाठी आजपासून नवे नियम लागू, पाहा दादर स्टेशनचे PHOTOS

COVID-19: महाराष्ट्रात 'एंट्री' करण्यासाठी आजपासून नवे नियम लागू, पाहा दादर स्टेशनचे PHOTOS

राज्यामध्ये कोरोनाचा धोका वाढू नये याकरता राज्य सरकारकडून परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांबाबतचे काही नियम कठोर करण्यात आले आहेत. दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांचे रेल्वे स्थानकात स्क्रिनिंग होणार आहे

112

राज्यामध्ये कोरोनाचा धोका वाढू नये याकरता राज्य सरकारकडून परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांबाबतचे काही नियम कठोर करण्यात आले आहेत. दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आपल्यासोबत बाळगण्याच्या सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत. याबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढले होते. तसंच मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी देखील याबाबत माहिती दिली होती. (फोटो- दादर स्टेशन)

212

दरम्यान मुंबईतील रेल्वे स्टेशनवर रॅपिड अँटीजेन टेस्टिंग आजपासून सुरू करण्यात आले आहे. दादर स्टेशनवर ही चाचणी सुरू केली गेली आहे. यादरम्यानचे दादर स्टेशनवरील काही फोटो

312

पालिकेने सगळ्या वॉर्ड मधील अतिरिक्त आयुक्तांना अशी चाचणी करण्याचे आदेश दिले होते.

412

याठिकाणी करण्यात आलेली अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह असेल तर घरी जाऊ दिलं जाईल अन्यथा संबंधित व्यक्तीस क्वारंटाइन सेंटर किंवा गरजेचं असेल तर रुग्णलायत भरती केलं जाईल

512

4 अतिबाधित असलेल्या राज्यातून येणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची यादी करून त्यावर त्यातील पॉझिटीव्ह रुग्णांचा रेकॉर्ड ठेवला जाईल आणि त्यानुसार त्याला ट्रॅक केलं जाईल

612

दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोविडची आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असल्याचं परिपत्रक राज्यसरकारने काढलं होतं.

712

मुंबईतील सर्व रेल्वेच्या स्टेशनवरही तपासणी सुरू केली आहे. मुंबईत सध्या कोरोनाची स्थिती ही नियंत्रणात आहे. बेड योग्य प्रकारे उपलब्ध आहेत. त्यामुळे कोरोनाची लाट येईल की नाही हे माहीत नाही. पण पालिकेने याचे नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे आता लोकांनी जे नियम दिले ते पाळणं गरजेचे असणार आहे, असे इक्बालसिंग चहल यांनी सांगितलं आहे. त्याच पार्श्वभूमिवर आजपासून दादर स्थानकात ही चाचणी सुरू करण्यात आली आहे.

812

दादरशिवाय मुंबईतील इतर स्थानकांतही ही अँटिजेन चाचणी सुरू करण्यात आली आहे. परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं बंधनकारक आहे. पण जेव्हा राज्य सरकारने याबाबत परिपत्रक काढलं, त्यानंतर लगेचच या प्रवाशांकडे असा अहवाल असेल याची खात्री बाळगता येत नाही. त्यामुळे आजपासून मुंबईतील रेल्वे स्थानंकांमध्ये अँटिजेन टेस्टिंगची सुरुवात करण्यात आली आहे.

912

दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनी राज्यात येण्याच्या 72 तास आधी कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. राज्यात येणाऱ्या प्रवाश्यांकडे आरटी-पीसीआर रिपोर्ट नसेल, त्यांना विमानतळावर स्वखर्चाने करोना चाचणी करावी लागेल.

1012

महाराष्ट्रात दाखल झालेल्या ज्या प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल, त्यांच्याशी संपर्क साधून आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.

1112

चाचणी निगेटिव्ह असेल तर प्रवाशाला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. फोन नंबर, पत्त्यासह सर्व माहिती त्या प्रवाशाकडून घेतली जाईल.

1212

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बोरिवली, अंधेरी, वांद्रे टर्मिनस, दादर, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी आणि कुर्ला) अशा मुख्य स्थानकांवर सतर्क रहाण्याची सूचना केली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात परराज्यातून प्रवासी दाखल होतात.

  • FIRST PUBLISHED :