मुंबईमध्ये कोरोनाने कहर केला आहे. शुक्रवारी धारावीत आणखी 5 रुग्ण आढळले आढळले आहेत. एकूण रुग्ण संख्या 22 वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सध्या धारावी परिसर सील करण्यात आला आहे.
धारावीत पोलिस स्टेशनबाहेर निर्जंतुकीकरणासाठी पहिला 'सॅनिटायझेशन टेंट' उभारण्यात आला आहे. स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या या सॅनिटायझेशन टेंटमुळे धारावीतील पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेली धारावी आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. त्यामुळे आता या भागात कोरोनाचं संक्रमण रोखणं मोठं आव्हान आहे.
यासाठी मिशन धारावीची सुरुवात झाली आहे. यामध्ये खाजगी डॉक्टर्स आणि पालिका वैद्यकीय अधिकारी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत.
कुणालाही ताप सर्दी खोकला अशी लक्षण आढळून आली तर त्यांना कोरनटाईन करून यांचे कोरोनासाठी स्क्रिनिंग केले जाणार आहे.
त्यासाठी आयएमएने दीडशे खाजगी डॉक्टरांची टीम तयार केलेली आहे.
धारावीत तब्बल साडेसात लाख लोक राहतात. यातील प्रत्येकाची तपासणी केली जात आहे.
दोन खाजगी डॉक्टर, पालिकेचे दोन आरोग्य अधिकारी आणि एक सहाय्यक अशी पाच जणांची टीम घरोघरी जाणार.
ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल त्यांना रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.
धारावीमध्ये 4था मृत्यू झाला आहे. बालिगा नगर मधील रहिवासी 80 वर्षाच्या व्यक्तीचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.