मुंबईतील पवई येथे पोलिसांनी रात्री रुट मार्च काढला संपूर्ण पवई भागातून हा रुट मार्च काढण्यात आला यावेळेस नागरिकांनी टाळ्या वाजवून पोलिसांचे आभार मानले.
पवई पंचशील नगर, चैतन्य नगर इत्यादी भागातून करोनाग्रस्त पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत.
या सील केलेल्या विभागांच्या आजूबाजूच्या परिसरातून रुट मार्च काढण्यात आला. यावेळी नागरिकांनी टाळ्या वाजवून पोलिसांचे आभार मानले.
नागरिकांना घरी राहण्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला व त्यांना घरी राहण्याचे आवाहन यावेळेस पोलिसांनी केले.
कंटेनमेंट झोन जवळ असलेल्या हीरानंदानी हॉस्पिटल येथे काही करोनाग्रस्त रुग्ण इलाज घेत आहेत. त्या हॉस्पिटल मधील डॉक्टरांचे, नर्सेसचे, इतर स्टाफ आणि सिक्युरिटी स्टाफ यांचे जाहीर आभार मानण्यात आले. (संकलन : मेघा जेठे.)