रात्रभर मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे. मुसळधार पावसाने अख्खी मुंबई पाण्याखाली गेली आहे. (Credit: twitter)
शनिवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसानं रात्री जोर धरला आणि मुंबईकरांची दाणादाण उडाली. (Credit: twitter)
मुंबईत दादर-कुर्ला आणि कुर्ला ते मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं लोकलच्या 4 सेवा विस्कळीत झाल्या आहेत. (Credit: twitter)
मुंबईच्या सायन भागातील हे दृष् आहे.
मुंबई सेंट्रल डेपोत प्रचंड पाणी भरलं आहे. (Credit: twitter)
लोकल सेवापासून रस्त्याच्या वाहतुकीपर्यंत आणि दुकानांपासून ते घरापर्यंत अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. (Credit: twitter)
शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत मुंबई शहरात 186 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे तर पूर्व उपनगरात 154 मिमी, पश्चिम उपनगरांत 208 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. (Credit: twitter)
दादर कुर्ला आणि मशीद बंदर येथे पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या 4 मार्ग बंद
वरळी बीएमसी कर्मचाऱ्यांच्या घरात पाणी शिरले आहे. जे कर्मचारी दिवस रात्र मुंबईसाठी काम करतात त्यांच्याच घरातली ही अवस्था आहे. (Credit: twitter)
दादर पूर्व हिंदु काॅलनी परिसरांत सर्वत्र पाणी साचले. अनेक दुकांनात पाणी रात्री शिरलेले आहे.
मुंबईत सर्वत्र अजूनही पाऊस जोरात आहे
सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची झोप उडाली. (Credit: twitter)
दादर पूर्व किंग सर्कल पाणी साचल्याने रस्ता वाहतूक बंद. दादर पूर्व कडून पश्चिम कडे प्लाझा सिनेमा दिशेन जाणारा टिळक पुल रस्ता तुर्तास पाणी असल्याने बंद केला.
फोर्ट, मारिन लाईन्स, दादर भागांत जोरदार सरी बरसातायत
पश्चिम उपनगरात पावसाने अक्षरशः झोडपले
झव्हेरी बाजार परिसरात इलेक्ट्रिक लाईट बंद पडल्या आहेत तर अनेक ठिकाणी दुकांनांमध्ये पाणी शिरलं आहे. (Credit: twitter)