विनय दुबे, प्रतिनिधी मुंबई : घरातून निघताना लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, कारण आज पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे.
बोरिवली ते चर्चगेटकडे जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्या 35 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहेत.
फास्ट आणि स्लो या दोन्ही लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत.
तांत्रिक अडचणीमुळे ट्रेन उशिराने धावत असल्याची माहिती मिळत आहे. लोकल ट्रेन उशिराने धावल्याने प्रवासी नाराज झाले आहेत.
पश्चिम रेल्वेचे पीआरओ म्हणाले की, बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ पॉईंट बिघाड झाला होता.