NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / धारावीच्या झोपडपट्टीतील मुलगी 14व्या वर्षी बनली मॉडेल; फोटो पाहून विश्वास नाही बसणार

धारावीच्या झोपडपट्टीतील मुलगी 14व्या वर्षी बनली मॉडेल; फोटो पाहून विश्वास नाही बसणार

मुंबईतील धारावी येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या 14 वर्षांची मुलगी आघाडीच मॉडेल झाली आहे. तिला 'स्लम प्रिन्सेस' म्हणून ओळखलं जाते.

18

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री आणि अँकर सिमी ग्रेवालने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये झोपडपट्टीत राहणारी 14 वर्षांची मुलगी दिसत आहे.

28

ती एका मोठ्या स्किन केअर प्रोडक्टच्या दुकानात जाताना दिसते. मुलीने दुकानात प्रवेश करताच तिच्या समोर तिचे एक अतिशय ग्लॅमरस पोस्टर दिसते, ज्याचा वापर या स्किन केअर प्रोडक्टला प्रमोट करण्यासाठी केला आहे. आलिशान दुकानात हे पोस्टर आणि तिचे पोस्टर पाहून ती मुलगी उत्साहित होते.

38

मुंबईतील धारावीमधील झोपडपट्टीत राहणारी मलेशा खारवा ही लक्झरी ब्युटी ब्रँड फॉरेस्ट एसेंशियल्सच्या 'द युवती कलेक्शन' या नवीन मोहिमेचा चेहरा बनली आहे.

48

तिने आपल्या टॅलेंटने सोशल मीडियावरही दबदबा निर्माण केला आहे.

58

मलिशा आज तिच्यासारख्या हजारो मुलींना प्रेरणा देत आहे.

68

मलिशा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असून तिचे इंस्टाग्रामवर 225,000 फॉलोअर्स आहेत.

78

अभिनय आणि मॉडेलिंगमधील तिची प्रतिभा, इंस्टाग्रामवर काँटेन्ट क्रेएटरच्या रुपाने विकसित झाली आहे.

88

ती डायनॅमिक शूटसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिची सर्जनशील प्रतिभा पाहायला मिळते.

  • FIRST PUBLISHED :