भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मुंबईत भीमसैनिकांचा सागर उसळला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात लाखो भीम सैनिकांनी गर्दी केली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 डिसेंबर 1956 रोजी मुंबईतील चैत्यभूमीवर त्यांच्यावर बौद्ध पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना दाखवणाऱ्या फोटोंचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आले होते.
शिवाजी पार्क येथे आलेल्या अनुयायांच्या काळजीसाठी आरोग्य केंद्र उभारण्यात आले होते
दादर परिसरात मोठ्या प्रमाणात जनसागर नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र पोलीस तैनात करण्यात आले आहे. मुंबई पोलीस संपुर्ण दादर परिसरात विविध ठिकाणी तुकड्यांमध्ये बंदोबस्त करण्यात आला आहे.