देशात सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुंबई हे कोरोनाचं नवं क्रेंद झालं आहे.फोटो-स्वाती लोखंडे
अशा परिस्थितीतही मुंबईकर या गोष्टीला गांभीर्यानं घेताना दिसत नाही आहे. याचा प्रत्यय हे फोटो पाहून येईल.फोटो-स्वाती लोखंडे
लॉकडाऊनच्या काळातही मुंबईत वाहतुक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. फोटो-स्वाती लोखंडे
मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आलेल्या या गाड्यांनी चिंता वाढवली आहे.फोटो-स्वाती लोखंडे
एकीकडे मुंबईत कोरोना थैमान घालत असताना रस्त्यावर उतरलेल्या एवढ्या गाड्या एक भयावह परिस्थिती दाखवत आहे.फोटो-स्वाती लोखंडे
ही परिस्थिती पाहून Lockdown 5.0 मध्ये वाहतुक कोंडीवर अंकुश लावणं गरजेचं असल्याचं दिसत आहे.फोटो-स्वाती लोखंडे
रस्त्यांवर मोठ्या संख्येनं उतरलेल्या या गाड्या पाहून लॉकडाऊन हटवल्यास कशी परिस्थिती येईल, याचे चित्र दिसते.फोटो-स्वाती लोखंडे
त्यामुळं मुंबईकरांनी आता लॉकडाऊन गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे.फोटो-स्वाती लोखंडे