कोलबाड जाग माता मंदीर जवळ ठाणे (प.) येथे कोलबाड मित्र मंडळ या सार्वजनिक गणपतीच्या मंडपावर व दोन पार्क केलेल्या गाड्यांवर झाड पडल्याची माहिती समोर आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित आहेत.
झाड पडल्यामुळे पाच व्यक्तींना दुखापत झाली आहे. यातील एका महिलेचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत.
राजश्री वालावरकर (५५ वर्ष), प्रतिक वालावरकर (30 वर्षे), कीविन्सी परेरा (40 वर्षे), सुहासिनी कोलुंगडे (56 वर्षे), दत्ता जावळे (50 वर्षे) यांना दुखापत झाली आहे.
अधिकाऱ्यांकडून झाड हटवण्याचं काम सुरू आहे.
ठाण्यातील कोलबाडच्या राजाची शेवटची आरती सुरू असताना गणपतीच्या मंडपावर झाड कोसळलं.