मुंब्रा इथं प्लास्टिक गोडाउनला बुधवारी रात्री भीषण आग लागली. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं काम सुरू होतं.
खर्डी तलावाच्या शेजारी असलेल्या भारत गिअर कंपनीच्या गोडाउनला भीषण आग लागली.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच RDMC आणि फायर ब्रिडेगच्या 2 गाड्या आणि 2 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले.
आगीच्या घटनेत सुदैवाने कोणताही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते.
प्लास्टिक गोडाउन असल्यानं आग जास्त भडकली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.