कोरोनाव्हायरस या जागतिक धोक्यामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहे.
यामुळे देशातील 27 नवविवाहित जोडपी इंडोनेशिया येथील बाली या बेटावर अडकली आहेत.
हनीमून ट्रीपवर गेलेली ही 27 नवविवाहित जोडपी बाली येथील बेटावर अडकली असून, त्यांच्या घरच्यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.
मुख्य म्हणजे कोरोनामुळे इंडोनेशियातील सर्व हॉटेल रिकामी करण्यात आली आहेत. त्यामुळे या जोडप्यांना राहण्यासही जागा नाही आहे.
13 मार्च रोजी मुंबईहून ही जोडपी इंडोनेशियाला रवाना झाली होती. मलिंडो एअरलाइन्सने ही जोडपी इंडोनेशियाला पोहचली.
यात, राजस्थान ,जयपुर, हैदराबाद , केरळ , पंजाब, आंध्र प्रदेश, मुंबई, पुणे , दिल्ली , तमिळनाडु , मोहाली ,उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील तब्बल 27 जोडपी आहेत.
हनीमूनसाठी गेलेल्या या जोडप्यांनी आपले व्हिडीओ कुटुंबाना पाठवले आहे.
या व्हिडीओच्या मदतीने कुटुंबियांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे.