कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे फक्त सरकारी नाही तर खासगी लसीकरण केंद्रांवरही लस दिली जाते आहे.
मुंबईत महापालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालयात लस दिली जाते आहे. तसंच खासगी लसीकरण केंद्रामार्फत काही ऑफिसमध्येही लसीकरण कार्यक्रम राबवला जातो आहे.
दरम्यान मुंबई महापालिकेने कोरोना लसीकरणाबाबत नव्या सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचं पालन करणं बंधनकारक आहे.
महापालिका, सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रावर कोणतंही राजकीय फलक, बॅनर, पोस्टर, होर्डिंग्ज लावण्यात मनाई करण्यात आली आहे.
खासगी लसीकरण केंद्रांनी औद्यागिक संस्थांमध्ये लसीकरण करण्यापूर्वी संबंधित संस्थेशी करार करावा. यामध्ये खासगी केंद्रामार्फत उपलब्ध असलेले वैद्यकीय कर्मचारी आणि आपात्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेची उपलब्धता याबाबत स्पष्टपणे उल्लेख असावा.
मुंबई बाहेरील कुठल्याही खाजगी लसीकरण केंद्राला मुंबईत येऊन लसीकरण करण्याची मुभा नाही.