NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / कोरोना लस घ्यायला जाणाऱ्या मुंबईकरांनो लक्ष द्या! लसीकरण मोहिमेत BMC ने केला मोठा बदल

कोरोना लस घ्यायला जाणाऱ्या मुंबईकरांनो लक्ष द्या! लसीकरण मोहिमेत BMC ने केला मोठा बदल

Corona vaccination In Mumbai : मुंबईतील कोरोना लसीकरण मोहीम दोन टप्प्यात विभागण्यात आली आहे.

17

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबवली जाते आहे. 1 मेपासून 18+ नागरिकांनाही कोरोना लस दिली जाते आहे.

27

त्यामुळे अनेक नागरिकांनी लस घेतली आहे, तर काही लस घेण्याच्या तयारीत आहे. तुम्हीसुद्धा कोरोना लस घेण्याच्या तयारी असाल आणि मुंबईत राहत असाल तर मग तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

37

मुंबईत कोरोना लसीकरण मोहिमेत मोठा बदल करण्यात आला आहे. बीएमसीने काही नवे नियम बनवले आहेत. 

47

सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवसच वॉक इन लसीकरणाची सुविधा उपलब्ध असेल. म्हणजे थेट लसीकरण केंद्रावर जाऊन तिथं नोंदणी करून तुम्हाला लस घेता येईल.

57

वॉक इन लसीकरणाची सुविधा फक्त 60 पेक्षा जास्त वयाचे नागरिक, दिव्यांग नागरिक आणि कोरोना लशाची दुसरा डोस घेणाऱ्यांसाठीच असेल.

67

तर गुरुवार शुक्रवार, शनिवारी प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 टक्के लसीकरण हे केवळ कोविनवर नोंदणी आणि त्यानंतर लसीकरण केंद्र आणि लसीकरणाची वेळ निश्चित झाल्यावर होईल. 

77

रविवारी मुंबईत लस दिली जाणार नाही. म्हणजे यादिवशी लसीकरण कार्यक्रम बंद असेल.

  • FIRST PUBLISHED :