मुंबईत पश्चिम द्रूतगती मार्गावर गुरुवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला.
भर रस्त्यातच चालकाचा ताबा सुटून ट्रक उलटला.
या अपघातात ट्रकचालक जखमी झाला आहे.
भर रस्त्यात ट्रक उलटल्याने मुंबईच्या या महत्त्वाच्या रस्त्यावर वाहतूक अडली.
पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी जखमी ट्रकचालकाला रुग्णालयात पोहोचवलं.
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर गोरेगावजवळ हा अपघात झाला.
ऐन पावसात रहदारी अडल्याने बराच काळ नागरिकांचा खोळंबा झाला होता.