NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / मुंबईत रस्त्यांची चाळण, संतप्त महिलांनी खड्ड्यांभोवती काढली रांगोळी PHOTOS

मुंबईत रस्त्यांची चाळण, संतप्त महिलांनी खड्ड्यांभोवती काढली रांगोळी PHOTOS

Mumbai Pothole: मुसळधार पाऊस गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाला आहे. या पावसामुळे मुंबईतील खड्डयांची अक्षरक्ष दुर्दशा झाली आहे.

16

मुंबईत पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पाऊस गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाला आहे. या पावसामुळे मुंबईतील खड्डयांची अक्षरक्ष दुर्दशा झाली आहे. (Photo Credit- Ganesh Raghunath Kale)

26

मुंबईतील खड्डयांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोकण नगर भांडूप येथे स्थानिकांनी खड्यांभोवती आज रांगोळी काढली होती.

36

महानगर पालिकेतल्या अधिकाऱ्यांन जाग आली पाहिजे म्हणून महिलांनी रांगोळी काढून रस्त्यांची झालेली चाळण दाखवली आहे.

46

अधिकाऱ्यांचे डोळे उघडले पाहिजे. कारण आमची मुलं खड्ड्यांतून प्रवास करत असतात ती ॲाफिसला पोहोचली की नाही याची आम्हांला काळजी वाटत असते. मास्क न घालणाऱ्यांसाठी मुंबई पालिका दंड वसुली करत असते. आता खड्डे न बुजवाणा-या अधिकाऱ्यांसाठी पालिका काय कारवाई करणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

56

मुंबई महानगरपालिकेनं रविवारी 11 जुलै रोजी मुंबईत फक्त ११ खड्डे बुजवणे शिल्लक असल्याची माहिती दिली. मुंबईतील खड्डे सर्वेक्षणात 412 खड्डयांपैकी 246 खड्डे बुजवण्यात आलेत. 141 खड्डे बुजवण्याचे नियोजन करण्यात आलेत.

66

14 खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्वाधिक खड्डे अंधेरी पश्चिम, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, मालाड या परिसरात आहे. मुंबईत दरवर्षी रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्यानंतरही रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रकार कायम आहेत.

  • FIRST PUBLISHED :