अक्षय्य तृतीया निमित्ताने आज सिद्धीविनायक मंदिरात खास महागड्या हापूस आंब्याचा नैवेद्य दाखवण्यात आला.
या शुभ प्रसंगी बाप्पाला हापूस आंब्यांची सजावटही करण्यात आली. आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
साडेतीन मुहूर्तांपैकी सर्वात शुभ मुहूर्त आजचा समजला जातो.
सिद्धीविनायक मंदिरात आज भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळत आहे.
हापूस आंब्यांनी सजावट केल्यामुळे गाभाऱ्यात हापूसचा वास दरवळत आहे.
भाविक मनोभावे बाप्पाचं दर्शन घेताना दिसत आहेत. तर ठिकठिकाणी आज बाप्पाला आंब्याची सजावट करण्यात आली आहे.
भाविक मनोभावे बाप्पाचं दर्शन घेताना दिसत आहेत. तर ठिकठिकाणी आज बाप्पाला आंब्याची सजावट करण्यात आली आहे.